“काय हायवे, काय डोंगार, काय हॉटेल!”, भरसभेत पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी

| Updated on: Sep 25, 2022 | 1:12 PM

ऊसतोड कामगार मुकादम मेळाव्यात बोलताना त्यांनी शहाजीबाजू पाटलांचा डायलॉग पंकजा मुंडेंनी पुन्हा नव्या रुपात सादर केला.

महेंद्र मुधोळकर, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बीड : शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या डायलॉगची सर्वांनाच भुरळ पडलेली आहे. आता याला भाजप नेत्या पंकजा मुंडेदेखील अपवाद नाहीत. शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची पुनरावृत्ती पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलीय. ऊसतोड कामगार मुकादम मेळाव्यात बोलताना त्यांनी शहाजीबाजू पाटलांचा डायलॉग पंकजा मुंडेंनी पुन्हा नव्या रुपात सादर केला. “काय हायवे, काय डोंगार, काय हॉटेल!”, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. बीड येथील मांजरसुंबा येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगार आणि मुकदमांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी हा डायलॉग म्हटला आणि एकच हशा पिकला.

Published on: Sep 25, 2022 12:31 PM
‘दसरा मेळाव्यात गांधी, पवारांचे विचार मांडू नका’ ठाकरेंना कुणी दिला सल्ला?
मी पण आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही; अजित पवारांचा मोदींना खोचक टोला