‘लाठीमार, गोळीबार प्रकरणी भाजपच्या व्यक्तीचा हात…’, रोहित पवार यांचा नेमका निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 05, 2023 | 9:30 PM

जालना येथे झालेल्या लाठीचार्ज प्रश्नी जुडेशिअल इंक्वायरी व्हायला पाहिजे आणि यातूनच हा प्रश्न सुटणार आहे. जुडीशियल कमिटी असल्यामुळे नेमकं कळेल की त्यावेळी फोन कुणाचा गेला होता. कुणाच्या फोनमुळे त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला गोळीबार झाला.

जळगाव : 05 सप्टेंबर 2023 | शरद पवारांसोबत भाजपने जे काय केलं आणि जे निष्ठावंत शरद पवारांसोबत होते ते भाजपसोबत सत्तेसाठी गेले हे लोकांना आवडलेलं नाही. अजित दादांनी जी भूमिका बदलली ती महाराष्ट्रात कोणालाही पटलेली नाही. त्यामुळे आम्हाला त्यावर जास्त बोलायचं नाही. बारामतीमध्ये अजित दादा परत या अशा घोषणा देण्यात आल्या. शेवटी ते मतदार आहेत त्यांना तो अधिकार आहे. भाजप सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी चेंगराचेंगरी झाली. बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. त्यावर एक चौकशी समिती नेमावी अशी आम्ही मागणी केली. पण, अधिकाऱ्यांची समिती नेमली. त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर राज्य सरकार देत नाही. जालना येथे झालेल्या लाठीचार्ज प्रश्नी जुडेशिअल इंक्वायरी व्हायला पाहिजे आणि यातूनच हा प्रश्न सुटणार आहे. जुडीशियल कमिटी असल्यामुळे नेमकं कळेल की त्यावेळी फोन कुणाचा गेला होता. कुणाच्या फोनमुळे त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला गोळीबार झाला. लाठीमार, गोळीबार प्रकरणी भाजपच्याच व्यक्तीचा हात असू शकतो, असे धक्कादायक विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले.

Published on: Sep 05, 2023 09:30 PM
गिरीश महाजन यांचे भाषण, आंदोलकांचा गोंधळ, मनोज जरांगे म्हणाले, तुमच्यासाठी मरायला बसलोय…
‘मुख्यमंत्र्यांचा मान ठेवा’, जरांगे पाटलांनी ‘ती’ ऑफर धुडकावली आणि शिष्टमंडळ माघारी