कन्हैयासारखे भारत तोडो म्हणणारे पक्षात अन् नेते भारत जोडोची यात्रा करतात, काँग्रेसवर सणकून टीका कुणाची?
पैसे घ्या, टेंडर घेऊन कमीशन घ्या, यापलिकडे हे नेते गेलेच नाही. अशा सरकारच्या या तीन पक्षांवर काय बोलायचं, असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय.
नागपूरः कन्हैयाकुमारासारखे भारत तोडो म्हणणारे काँग्रेसमध्ये (Congress) येतात आणि यांचे नेते भारत जोडोची (Bharat Jodo) यात्रा करतात, असा घणाघात भाजप नेते राम कदम यांनी केलाय. नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाच्या गणवेशावरून आज खोचक टीका केली. नागपूरची चड्डी घातली की सनदी अदिकारी थेट जॉइंट सेक्रेटरीच्या लेव्हलवर जातो, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. त्यावर राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. संघाच्या गणवेशावर बोलण्याआधी संघाच्या शाखेवर जाऊन पहावं, देशप्रेम काय असतं, समर्पित भावानं लोकांची सेवा कशी करायची ते त्यांना कळेल, असं वक्तव्य रामकदम यांनी केलंय. सत्तेत असताना काँग्रेसने वसुली वसुली हा कार्यक्रम केला. पैसे घ्या, टेंडर घेऊन कमीशन घ्या, यापलिकडे हे नेते गेलेच नाही. अशा सरकारच्या या तीन पक्षांवर काय बोलायचं, असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय.