नॉटरिचेबल समरजीत घाटगे संपर्कात; कार्यकर्त्यांना आव्हान करत म्हणाले, ‘उद्या भेटू, मी माझी भूमिका मांडणार…’

| Updated on: Jul 05, 2023 | 5:20 PM

त्याचबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर इतर 8 नेत्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील शिंदे गट आणि भाजपमध्ये नाराजी पसरली होती. तशीच नाराजी कोल्हापूर जिल्ह्यातही पहायला मिळाली.

कोल्हापूर : अजित पवार यांच्यासह त्यांच्या राष्ट्रवादी गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर इतर 8 नेत्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यावरून राज्यातील शिंदे गट आणि भाजपमध्ये नाराजी पसरली होती. तशीच नाराजी कोल्हापूर जिल्ह्यातही पहायला मिळाली. हसन मुश्रीफ हे मंत्री झाल्याने कागलमध्येच त्याचे तिव्र पडसाद उमठले. ग्रामिण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे नाराज झाले होते. तर ते आता भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. कारण समरजित घाटगे हे मुश्रीफांचे कट्टर विरोधक तर भाजपचे विधानसभेचे उमेद्वार आहेत. तशी त्यांची तयारिही सुरू होती. मात्र आता कट्टर विरोधकाच भाजपने मानगुटीवर बसवल्याने ते नाराज झाल्याचे कळत होते. त्यानंतर आता तीन दिवसांनी ते समोर आले आहेत. तर येताच त्यांनी आपली भूमिका आपण असे माध्यमातून मांडणार नाही. तर कार्यकर्त्यांना आजचा दिवस धीर धरावा आणि उद्या (6 जून) त्यांनी कागल शहरांमध्येच आपली भूमिका मांडणार आहे. गेल्या तीन दिवसात जे काही राजकारण झालं. त्यावर कुटूंबाशी चर्चा केल्यानंतर जो निर्णय घेतला आहे तो तिथे सांगणार असेही त्यांनी म्हटलं आहे. तर माझा निर्णय हा कार्यकर्त्यांनी मान्य करायचा की नाही हे ही त्यांनीच ठरवारं. पुढील भूमिका, पुढची दिशा आपण मिळून ठरवू अशी साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या या नाट्यमय शपथविधीचा कोल्हापूरात पहिला भाजचा बळी जातो का आता हे पहावं लागणार आहे.

Published on: Jul 05, 2023 05:20 PM
‘शेर की दहाड सबसे अलग है!’ सक्षणा सलगर यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “मी जबाबदारीने सांगतोय की…”