राष्ट्रवादीच्या भाजपमधील प्रवेशानं पहिली नाराजी उघड; कोल्हापुरमधील भाजपचा मोठा नेता नाराज
राज्यभर दिसत असतानाच जिल्हा पातळीवर देखील नाराजी नाट्य पहायला मिळत आहे. प्रामुख्याने अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शपथविधी झाल्यामुळं. अजित पवार यांच्या प्रवेशानं पुण्यात भाजप नेते नाराज झाल्याचे कळत आहे.
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांनी भाजप-शिंदे सरकारमध्ये प्रवेश केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. याचा परिणाम राज्यभर दिसत असतानाच जिल्हा पातळीवर देखील नाराजी नाट्य पहायला मिळत आहे. प्रामुख्याने अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शपथविधी झाल्यामुळं. अजित पवार यांच्या प्रवेशानं पुण्यात भाजप नेते नाराज झाल्याचे कळत आहे. तर कोल्हापुरमध्येही त्याचे पडसाद उमठत आहेत. हसन मुश्रीफ हे मंत्री झाल्याने कागलमध्येच त्याचे तिव्र पडसाद उमठत आहेत. येथे भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे नाराज झाले आहे. ते नॉटरिचेबल झाले आहेत. तर त्यांच्या समर्थकांकडून पोस्टरबाजी करण्यात येत असून फक्त राजे असे म्हणत कार्यकर्त्यांकडून मुश्रीफ यांचा विरोध केला जात आहे.
Published on: Jul 04, 2023 10:59 AM