Special Report | भाजप- शिंदे गटात मंत्रिपदांवरुन ठरत नाही?
शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे शिंदे गट आणि शिवसेना या दोघांनाही कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. आता 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंसह, शिंदे गटाच्या 16 जणांच्या आमदारकीवरच टांगती तलवार आहे. त्यामुळं 1 ऑगस्टच्या सुनावणीकडे शिंदे-फडणवीसांचं लक्ष आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपदं मिळू शकतात मात्र शिंदेंनी 16 ते 18 मंत्रिपदाची मागणी केलीय
मुंबई : लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, हे एकच वाक्य सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) बोलतायत. पण 28 दिवस उलटलेत तरी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त काही निघालेला नाही. त्यामुळं सध्या महाराष्ट्र दोघेच चालवत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मात्र शिंदे-फडणवीसांचं वेट अँड वॉचचं कारण आहे, सुप्रीम कोर्टातली सुनावणी. शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे शिंदे गट आणि शिवसेना या दोघांनाही कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. आता 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंसह, शिंदे गटाच्या 16 जणांच्या आमदारकीवरच टांगती तलवार आहे. त्यामुळं 1 ऑगस्टच्या सुनावणीकडे शिंदे-फडणवीसांचं लक्ष आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपदं मिळू शकतात मात्र शिंदेंनी 16 ते 18 मंत्रिपदाची मागणी केलीय. त्यातचही शिंदेंनी वित्त किंवा गृह अशा महत्वाच्या खात्यांचीही मागणी केल्याचं कळतंय. ज्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत, त्यांना अधिक निधी देता यावं यासाठी वित्त खातं शिंदेंना हवंय. मात्र वित्त आणि गृह ही दोन्ही खाती भाजप आपल्याकडेच ठेवण्यास आग्रही आहे. याआधी शिंदे आणि भाजप नेतृत्वाच्या 4 बैठका झाल्यात पण तोडगा निघालेला नाही. शिंदेंना आधी मुख्यमंत्रिपद दिलंय आता अधिकची मंत्रिपदं दिली तर भाजपमध्येही अंतर्गत रोष वाढू शकतो.