Yakub Menon: याकूब मेनन यांच्या कबरीवरील सजावटीवरून भाजप -शिवसेना आमनेसामने
किशोरी पेडणेकर रऊफ मेननला कशासाठी भेटल्या असा सवाल भाजप नेते करताना दिसतात तर दुसरीकडे पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेननला भेटलेले तसेच राज्यपाल व रऊफ मेननला यांचे फोटो समोर आणले आहेत. त्यावरून किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सवाल केला आहे.
मुंबई – याकूब मेनन (Yakub Menon)यांच्या कबरीवरील सजावट प्रकरणाचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. भाजप आणि शिवसेनेतील (shiv sena)आरोप प्रत्यारोपांची मालिका आता वाढत चालली आहे टायगर मेननचा नातेवाईक रऊफ मेमन सोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(kishore pednekar) यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर किशोरी पेडणेकर रऊफ मेननला कशासाठी भेटल्या असा सवाल भाजप नेते करताना दिसतात तर दुसरीकडे पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेननला भेटलेले तसेच राज्यपाल व रऊफ मेननला यांचे फोटो समोर आणले आहेत. त्यावरून किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सवाल केला आहे.
Published on: Sep 10, 2022 05:32 PM