ममता बॅनर्जींच्या दहशतीमुळं तृणमूल काँग्रेसला सत्ता: रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
जालना: भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यंची दहशत असल्यानं त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.