जाऊ द्या हो…, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांनी बोलणे टाळलं
बावनकुळे यांच्या वक्तव्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा करण्यात आली. यावेळी गुलाबराव पाटील काय बोलणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते
मुंबई : आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला सोबत घेऊन जाणार. तर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. शिंदे गटाला 48 जागा तर भाजप 240 जागा जातील असेही त्यांनी घोषित केलं. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मात्र लगेचच असं काही झालेलं नाही, म्हणत त्यांनी सारवासारवही केली.
त्यानंतर याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा करण्यात आली. याच्या आधी त्यांच्या गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळे यांचे कान टोचले. त्यामुळे आता गुलाबराव पाटील काय बोलणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते. मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलं. तसेच जाऊ द्या हो आता ते, मी याच्यावर तुमच्याशी बोलत नाही असं म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.