‘लाठीचार्जवरून भाजप नेत्याचा विरोधकांना थेट आवाहनच; म्हणाला, ‘राजनीती करायची…’

| Updated on: Jun 13, 2023 | 8:31 AM

वारकऱ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. तर यावरून सरकारवर टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना थेट सुनावलं आहे.

आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यावरून आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. तर यावरून सरकारवर टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना थेट सुनावलं आहे. तसेच जर यात कोणाला राजकारण कारायचं असेल तर करा असं म्हटलं आहे. तर या घटनेवरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी देखील महाराष्ट्रातील सर्व पॉलिटिकल पक्षांना आवाहन केले की याचे राजकारण नका करू. मात्र तसं होताना दिसत नाही. उलट राजकारण केलं जात आहे. तर मागच्या वेळी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अशीच घटना झाली होती. पण ज्यांना राजकारण करायचाय त्यांनी राजकारण करावे, कारण फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलम आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Jun 13, 2023 08:31 AM
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली? दीपक केसरकर म्हणतात…
‘घरामध्ये गाढव पाळणारे सदावर्ते काय खातात हे तपासलं पाहिजे’