Chandrashekhar Bawankule | जयंत पाटील यांच्या निलंबनावरुन बावनकुळे यांची प्रतिक्रिया
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनात झालेल्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पाटील यांनी सभागृहात वक्तव्य केल्यामुळे पाटील यांच निलंबन झालं. तसेच बँक सांगलीची असो किंवा कोणतेही चौकशीसाठी समोरे जायला हवं
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनात झालेल्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनात निलंबनाची झाल्याची कारवाई योग्यच आहे. तसेच काही चूक नसताना भाजपच्या 12 आमदारांचे निलंबून तत्कालिन मविआ सरकारने केलं होतं.
तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन झालं.
त्यावर आता बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रीय दिली आहे. तसेच पाटील यांनी सभागृहात वक्तव्य केल्यामुळे पाटील यांच निलंबन झालं. तसेच बँक सांगलीची असो किंवा कोणतेही चौकशीसाठी समोरे जायला हवं.