Nagpur | काँग्रेस आता डुबतं जहाज तर आम्ही प्रचंड वेगात चालणारी बुलेट ट्रेन-tv9
तर काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेस आता डुबतं जहाज तर आम्ही प्रचंड वेगात चालणारी बुलेट ट्रेन आहे.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी, विरोधकांवर निशाना साधला. तर राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसवर टीका करताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत भाजपचे कमळ फुलेल आणि राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडेल असे म्हटलं. तर काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेस आता डुबतं जहाज तर आम्ही प्रचंड वेगात चालणारी बुलेट ट्रेन आहे. काँग्रेस हे आता डुबतं जहाज आहे, त्यामुळे डुबत्या जहाजाची बरोबरी ही प्रचंड वेगात धावणाऱ्या बुलेट ट्रेनबरोबर करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसची बरोबरी ही भाजपशी करू नये असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
Published on: Sep 16, 2022 04:45 PM