288 जागांवर भाजपच; मग शिंदे गटाचं काय? जयंत पाटील यांचं उत्तर

| Updated on: Mar 18, 2023 | 1:11 PM

बावनकुळे यांचं हे विधान आल्यानंतर आता शिंदे गटाचं काय असा प्रश्न सर्व सामान्यांपासून शिंदे गटातील नेत्यांनाही पडला असेल. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला. शिंदे गटाला 48 जागा तर भाजप 240 जागा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बावनकुळे यांचं हे विधान आल्यानंतर आता शिंदे गटाचं काय असा प्रश्न सर्व सामान्यांपासून शिंदे गटातील नेत्यांनाही पडला असेल. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

त्यांनी, तोपर्यंत हा गट रहायला तर हवा असं म्हटलं आहे. अजून एक वर्ष निवडणुकीला आहे. 288 जागा भाजपच्या चिन्हावरच लढवल्या जातील. शिंदे गटाचे नामोनिशाण राहणार नाही. एकटा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवेल. तर महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकदा भारतीय जनता पक्षच असेल शिंदे गट हा तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही.

Published on: Mar 18, 2023 12:27 PM
वाऱ्यावर सोडलं नाही म्हणता, मग… शेतकऱ्यांच्या मृत्यूवर राऊतांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं
औरंगाबाद नामांतरणावरून अंबादास दानवेंनी आंदोलक संघटना आणि पक्षांना सुनावलं, म्हणाले…