… हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?

| Updated on: Nov 27, 2024 | 1:14 PM

महायुतीचे सरकार स्थापन करण्यास वेळ लागत आहे. निकाल येऊन चार दिवस झाला तरी मुख्यमंत्री पदावरुन गोंधळ सुरु आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस झाले तरी सरकार स्थापन झालेले नाही. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रातील मंत्री पद नाकारले आहे, त्यांना गृहमंत्री पद हवे आहे असे म्हटले जात आहे. यावर प्रतिक्रीया देताना भाजपाचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी मला या संदर्भात काही माहिती नाही, यासंदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते घेत असतात असे म्हटले आहे. महायुतीचे सरकार असताना सर्वांशी बोलून कोणला कोणती खाती द्यायची यावर चर्चा होत असते. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडायचा नसतो. त्यामुळे थोडा वेळ लागत असतो. तीन पक्षांचा विचार करावा लागतो. एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सर्वांना न्याय मिळेल असे परफॉर्मेस असे सरकार बनेल. आम्हाला वाटते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावे तसे शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना वाटते ते बनावे. २ कोटी ४८ लाखावरुन आम्ही ३ कोटी १७ वर गेलो आणि महाविकास आघाडी २ कोटी ५० वरुन २ कोटी १७ वर आली. त्यामुळे महाविकास आघाडीने तोंडाच्या वाफा करण्यापेक्षा ईव्हीएमवर डांबरटपणा करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे असे बावणकुळे यांनी म्हटले आहे.

 

Published on: Nov 27, 2024 01:13 PM
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत, राऊत यांच्यावर शिरसाट यांचा पलटवार
‘सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत….,’ काय म्हणाले अंबादास दानवे