‘मविआचे तुकडे कधी पडले हे कळणार सुद्धा नाही; त्यामुळेच…’; भाजप नेत्याची विरोधकांवर टीका

| Updated on: Jun 28, 2023 | 8:18 AM

महाआघाडीतील लोकांकडून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळा झाल्याचा घणाघात केला. तर महाआघाडीतील नेते हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागल्यानेच ते भाजपविरोधात एकत्र येऊ लागले आहेत असं म्हटलं होतं.

मुंबई : पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. तर त्यांनी महाआघाडीतील लोकांकडून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळा झाल्याचा घणाघात केला. तर महाआघाडीतील नेते हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागल्यानेच ते भाजपविरोधात एकत्र येऊ लागले आहेत असं म्हटलं होतं. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महाविकास आघाडीसह महाआघाडीतील नेत्यांच्या बैठकीवर टीका केली आहे. त्यांनी मोदी म्हणतात ते खरं आहे. महाआघाडीतील नेत्यांना आता घोटाळ्यांची चिंता आहे. त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते एकत्र येत आहेत. तर येथेही मविआ तूटत आहे. त्यामुळे भविष्यात पहा याचे किती तुकडे पडतील. याच कारणाणे मविआतील चांगले नेते हे भाजप, शिंदे यांची शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तर मोदींच्या नेतृत्वात आम्ही चांगल्या जागा जिंकूच तर राज्यात फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jun 28, 2023 08:18 AM
भाजपला पंकजा मुंडे सोडचिठ्ठी देणार काय?; रामदास आठवले म्हणतात, ‘त्या…’
भिडे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार; काँग्रेस नेता म्हणाला, ‘भिडे यांना म्हातार चळ लागलीय’