‘…अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते…’; दौऱ्यावरून ठाकरे यांच्यावर कोणी केली टीका

| Updated on: Jul 09, 2023 | 2:21 PM

शिवसेना आणि त्यांनंतर आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे हे मैदानात उतरले आहे. तर ते आपल्या दौऱ्याला विदर्भातील यवतमाळमधून सुरूवात करत आहेत.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिवसेना आणि त्यांनंतर आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे हे मैदानात उतरले आहे. तर ते आपल्या दौऱ्याला विदर्भातील यवतमाळमधून सुरूवात करत आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी, सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्तेवर असताना मंदिर बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे. तर उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका असे आवाहन देखील बावनकुळे यांनी केलं आहे.

Published on: Jul 09, 2023 02:21 PM
ठाकरेंच्या पोस्टरवर ‘धर्माभिमानी’ उल्लेख, महंत सुनील महाराज म्हणतात, “खरे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेच”
उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा; भाजप नेता म्हणतो, “मजबुरीमुळे…”