ठाकरे यांच्या सभेला काँग्रेस-राष्ट्रवादीने कार्यकर्ते पाठवले, बावनकुळे यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीत झालेल्या सभेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी ठाकरेंच्या सभेला मोठं करण्यासाठी पैशांचा गैरवापर झाला असं म्हटलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जोरदार सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती. या गर्दीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांच्या या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादीने कार्यकर्ते पाठवले अशी टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांनी यावेळी, ठाकरेंच्या सभेला मोठं करण्यासाठी पैशांचा गैरवापर होत असल्याचेही म्हटलं. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर देताना, कोकणातील माणूस, जनता ही ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभी आहे आणि ती तशीच राहणार. ही खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.
Published on: Mar 06, 2023 07:24 PM