Maharashtra Politics : अनिल देशमुख यांना भाजप नेत्याचा गर्भीत इशारा; म्हणाला, ”जामीन मंजूर… मात्र..”
अनिल देशमुख म्हणाले, केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. असे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, तेथे खोटे आरोप करून चौकशी सुरू करण्याचा हा उद्योग देशात सुरू आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केंद्रीय एजन्सीच्या गैरवापराबाबत वक्तव्य केले आहे. अनिल देशमुख म्हणाले, केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. असे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, तेथे खोटे आरोप करून चौकशी सुरू करण्याचा हा उद्योग देशात सुरू आहे. हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. आम्ही प्रतिसादाची वाट पाहत आहोत असे म्हटलं होतं. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. देशमुखांवरील आरोपांची सुनावणी न्यायालयात अजून सुरु आहे. मात्र ते खुद्द न्यायालयाबाबत मतप्रदर्शन करत आहेत. यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. देशमुख यांनी या बाबत जाहीर वक्तव्ये न थांबविल्यास न्यायालयाकडे त्यांची तक्रार करू, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे.