‘पवार नावाची कीड लागली आहे’; गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी, राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आलं नाही अशी टीका केली
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. पडळकर यांनी, पवार नावाची कीड लागली आहे. ती महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल असं म्हटलं आहे. तसेच पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून पवारांवर हल्ला चढवला. पुण्यात यांचीच सत्ता होती. मात्र पुण्याची काय अवस्था आहे? वाहतूक कोंडी होते. मग का काही केलं नाही? नवीन काही करायचं नाही. फक्त आहे त्याची धार काढत बसायची”, असा घणाघात पडळकर यांनी केला.
शरद पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी, राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आलं नाही अशीही टीका केली. तर पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटलं दुष्काळी भागात पाणी द्याव? ते केंद्रीय कृषी मंत्रीही होते. मात्र राज्यात पैसा आणावा असेही का नाही वाटलं असा सवाल करत टीका केली.