भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले असे अनेक बॉम्बस्फोट…

| Updated on: Jan 12, 2023 | 3:03 PM

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचेही नाव चर्चेत असून अनेक जण वाट पाहण्याच्या मनस्थितीत नाहीत.

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DEVENDRA FADNAVIS ) हे दोन्ही एकदिलाने काम करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDRA MODI ) आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जनतेचा विश्वास आहे.

राहुल गांधी ( RAHUL GANDHI ) यांची भारत जोडो यात्रा सुरु असताना काँग्रेसच्या १५०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये तर ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे यांच्या पक्षात सामील होणार आहेत. त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहे.

२०२४ मध्ये उमेदवार मिळणार नाही अशी परिस्थिती महाविकास आघाडीवर ओढवणार आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचेही नाव चर्चेत असून अनेक जण वाट पाहण्याच्या मनस्थिती नाहीत. पुढील काळात प्रवेशाचे बॉम्बस्फोट रोज रोज होतील. अनेकांना अनेक धक्के बसतील, असे बावनकुळे म्हणाले.

Published on: Jan 12, 2023 03:03 PM
बच्चू कडू यांचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? अमोल मिटकरी यांचा मोठा दावा
सोन्याच्या चमच्याने बदामाचे ज्यूस घेत उद्धव मोठे झाले…बावनकुळे असे का म्हणाले?