कसबा आणि चिंचवड निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष उतरणार, काय आहे रणनिती ?
पुणे जिल्हयात होऊ घातलेल्या कसबा पेट आणि चिंचवड या दोन मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
नाशिक : पुणे जिल्हयात होऊ घातलेल्या कसबा पेट आणि चिंचवड या दोन मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः उतरणार आहेत. येत्या १५ फेब्रुवारीपासून बावनकुळे पुणे जिल्ह्यात मुक्कामी असणार आहेत. या काळात चिंचवड आणि कसबा मतदारसंघात ते बैठक आणि मेळावे घेणार आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष या निवडणुकीत जोमाने उतरणार असल्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे