2019 मध्ये ‘हे’ फोटो पाहून जनतेनं झटका दिला होता….. सुधीर मुनगंटीवारांनी काय सांगितलं?
2019 मध्येही हे फोटो पाहूनच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका दिला होता. नाकारलं होतं. आता महाविकास आघाडीत हे फोटो लागतील.... असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
नागपूरः अंधेरी निवडणूक (Andheri East) भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना निश्चित जिंकेल, असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये टीव्ही9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यासोबतच 2019 मध्ये काय घडलं होतं, याचाही किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘ 2019 मध्येही निवडणुकीचे निकाल काँग्रेस राष्ट्रवादीला झटका, फटका, करंट देणारे होते. 161 विधानसभा तेव्हाही आम्ही जिंकल्या होत्या. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावूनच स्व. लटकेजी जिंकले होते.
पण आता तिथे फोटो बदललाय. तिथे सोनियाजींचा फोटो आहे. शरद पवार साहेबांचा फोटो आहे. 2019 मध्येही हे फोटो पाहूनच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका दिला होता. नाकारलं होतं. आता महाविकास आघाडीत हे फोटो लागतील. आणि दुसरी कडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लागतील. त्यामुळे भाजप निश्चित विजयी होईल…’