भाजप नेत्याच्या पहाटेच्या शपथविधी वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात, म्हणाल्या, ‘त्यांनी धास्ती घेतली’
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाहटेच्या शपथविधीवर भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असा मोठा गौप्यस्फोट केला. त्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात 2019 चा विषय पुन्हा चर्चीला जात आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाहटेच्या शपथविधीवर भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी, भाजपच्या नेत्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीच्या आलेल्या निकालावरून धास्ती घेतली आहे. कर्नाटकसारखा निकाल हा राज्यात ही येऊ शकतो म्हणून भाजपवाले असे बोलत आहेत. तर मुनगंटीवार यांनी धडा शिकवण्याची भाषा केली मला असं वाटते की शिंदे यांच्या बरोबर जाऊनच त्यांनी आता मोठा धडा शिकलेला आहे. त्यामुळे आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो असं त्यांना वाटतं असल्याचा धणाधात त्यांनी केली आहे. तसेच भाजप बद्दलची नकारात्मकता वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून समोर येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा रोवला, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बाजार उठला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 136 जागा मिळवल्याने भाजपची नकारात्मकता दिसून येत असल्याचेही त्या म्हणाल्या.