‘तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आता..,’ काय म्हणाले चंद्रकांत पाटील

| Updated on: Feb 24, 2024 | 2:58 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करताना राज्यातील परिस्थिती विचार करावा, मुलांच्या परीक्षा चालू आहेत. लग्न सराईचे दिवस आहेत जनतेला त्रास होणार नाही हे पाहीले पाहीजेत असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. जरांगेंना सगेसोयरेचा अध्यादेश हवा होता. सरकारने तातडीने नोटीफिकेशन काढले. सगेसोयरेची प्रक्रिया सुरु आहे. कुणबींना आरक्षण मिळणार नाही असं कोण म्हणतेय ही एक प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ द्या असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.

Follow us on

पुणे | 24 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सगे-सोयरे अध्यादेश काढून दिला होता त्यानंतर जरांगे आनंदानी घरी गेले होते. आता कुणबींना आरक्षण मिळणार नाही असेही कोणीही म्हटलेले नाही. आरक्षण मिळण्यासाठी एक प्रक्रिया करावी लागते ती होऊ द्या असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मोदींची लोकप्रियता वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातपाती सर्वांच्यावर गेले आहेत. लाभार्थी नावाचा गट एक त्यांनी तयार केला आहे. त्यांना हे राजकारण नको आहे. त्यांना लाभ हवे आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मध्यप्रदेशमध्ये भाजपा निवडून येणार हे माहीत होतं परंतू इतकं मताधिक्य मिळेल हे वाटलं नव्हतं. त्यामुळे लाभार्थ्यांनी मोदींनाच मत दिल्याचे स्पष्ट होत आहे. महायुती मजबूत होत चालली. कालच आलेल्या रिपोर्टनूसार भाजपाला 36 टक्के मते आणि सहयोगी घटक पक्ष मिळून 44 टक्के मिळत आहेत. त्यामुळे महायुतीला 45 जागा मिळतील असे म्हटले जात होते. परंतू आता 48 जागा मिळतील अशी स्थिती असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.