Dharmapal Mesharam | अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप, धर्मपाल मेश्राम यांची चौकशीची मागणी

| Updated on: Sep 01, 2022 | 2:57 PM

Dharmapal Mesharam | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर भाजपचे धर्मपाल मेश्राम यांनी कमिशनखोरीचा आरोप केला आहे.

Dharmapal Mesharam | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम (Dharmapal Mesharam ) यांनी कमिशनखोरीचा आरोप (Allegation) केला आहे. त्यांच्या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाने त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे मिटकरी यांच्या कमिशनखोरीविरोधात तक्रार दिल्याचा आरोप त्यांनी केला. 10 टक्के कमिशनशिवाय मिटकरी कोणतेही विकास काम होऊ देत नसल्याने विकास कामांना खिळ बसल्याचे मेश्राम यांचे म्हणणे आहे. मेश्राम यांनी याप्रकरणात चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मिटकरी यांनी सरकारविरोधात खरमरीत टीका केल्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तसेच विधानसभा अधिवेशनादरम्यान बाचाबाची आणि धक्काबुक्की ही झाली होती. त्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे.  आता आरोपांना आणखी धार चढणार आहे.

Published on: Sep 01, 2022 02:57 PM
Shinde Fadnavis Pune | पीएमपी ई-बसचं उद्धाटन, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री उद्या पुण्यात
Education : शिक्षक मतदार संघावरुन राजकारण..! आ.प्रशांत बंब अन् अभिजीत वंजारीमध्ये शाब्दिक चकमक