Ashish Shelar : शिवसेनेला टकमक टोकापर्यंत पोहचवण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी करतेय

| Updated on: Jan 03, 2023 | 7:36 PM

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला.

मुंबई : मविआमधील शिवसेनेला जर कोणी टकमक टोकापर्यंत पोहचवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी करतेय असा घणाघात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणाही साधला. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखिल टीका केली

यावेळी शेलार यांनी, इतिहासामध्ये फितूर माणसाचं पर्यायी नाव हे आणाजी पंत होतं मात्र आज हिंदुत्वाशी, महाराष्ट्र प्रेमाशी, मराठी मानसाशी, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी शाहिच्या इतिहासाबरोबर फितुरी करणारा हा सामनाच्या कार्यालयात कार्यकारी संपादक म्हणून बसला आहे. असी टीका शेलार यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

त्याचबरोब यावेळी शेलार यांनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याही वक्तव्यांचा समाचार घेतला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून एक नवीन स्क्रीप्ट लिहली जात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला.

Published on: Jan 03, 2023 04:57 PM
Devendra Fadnavis On Laxman Jagtap : लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का
Jitendra Awhad | भीक मागून शाळा सुरु केली, मध्यतंरी कुणीतरी बोललं : जितेंद्र आव्हाड