भाजपचे पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवार यांनी केला व्हिडीओ ट्वीट

| Updated on: Nov 16, 2024 | 1:47 PM

विधानसभा निवडणूकीत प्रचारातील पावरेला भाषेचा स्तर सर्वत पक्षांच्या उमेदवारांकडून यंदा निच्चतम पातळीवर गेलेला असताना आता जाहीर भाषणात अश्लील हातवारे करण्याचा प्रकार कर्जत-जामखेड येथे भाजपाचे नेते पाशा पटेल यांच्याकडून घडला आहे. भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे.

भाजपाचे पाशा पटेल यांनी जाहीर सभेत अश्लील हातवारे करीत निवडणूक प्रचारात अत्यंत खालची पातळी गाठल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहीत पवार यांनी केली आहे. आता पर्यंत निवडणूकीत भाषेचा स्तर घसरलाच होता आता तर अश्लील हातवारे करुन अत्यंत खालची पातळी गाठल्याचे दिसत असल्याचे रोहीत पवार यांनी समाजमाध्यमावर पाशा पटेल यांचा सभेतील व्हिडीओ पोस्ट करुन म्हटले आहे. शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गणंग..शिक्षक हे पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही असे या पोस्टमध्ये रोहीत पवार यांनी म्हटले आहे. यांची भाषा ऐकवायला मलाही लाज वाटते. पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय असेही रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

 

Published on: Nov 16, 2024 01:45 PM
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या झालेल्या मृत्यूने हळहळ
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप