अजित पवार आणि शिंदे यांच्यापुढे कमळावर लढा, असा जेपी नड्डांचा प्रस्ताव, संजय राऊत यांचा दावा

| Updated on: Feb 24, 2024 | 1:24 PM

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नुकतीच मुंबईला भेट दिली आहे. त्यांनी मुंबईतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर हिंदु कॉलनीतील निवासस्थान राजभवनला देखील भेट दिली.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी महायुतीतील घटक पक्षांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. आणि त्यांना शिवधनुष्य आणि घड्याळावर निवडणूक न लढता कमळावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव नड्डा यांनी ठेवल्याचा दावा शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पक्षातून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्यांना जरी पक्षांची अधिकृत नाव आणि चिन्हं मिळाली असली तर जनतेत त्यांच्या विरोधात प्रतिकुल मत असल्याने त्या चिन्हांवर त्यांना निवडून अवघड असल्याने जेपी नड्डा यांनी तसा प्रस्ताव ठेवल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. कमळाबाईंच्या पदराखालीच त्यांना जावे लागणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 24, 2024 01:23 PM