‘ब्लडप्रेशर’ आणि औषधांच्या दुकानात देवेंद्र फडणवीस? चंदकांत पाटील यांचं नेमकं विधान काय ?
पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकात पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यातील काही 'खास' गुण आपल्या शैलीत सांगितले. गेली काही वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत असल्यामुळे स्वाभाविकपणे मला ते गुण माहित आहेत.
पुणे : पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकात पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यातील काही ‘खास’ गुण आपल्या शैलीत सांगितले. गेली काही वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत असल्यामुळे स्वाभाविकपणे मला ते गुण माहित आहेत. योग्य वेळेला रागावणारे, योग्य वेळेला प्रेम करणारे, समजावणारे, योग्य वेळेला माणसाला मोठे करणारे आणि योग्य वेळी त्याला त्याची जागा दाखवणारे असे फडणवीस आहेत. महाराष्ट्रातल्या भल्या भल्या माणसांना, जे समाजामध्ये वर्षानुवर्ष ठिय्या मांडून बसलेले आहेत अशांना त्यांची भीती वाटते. त्यांच्यामुळे काहींचा ब्लडप्रेशर वाढतो. काहींचा कमी होतो. त्यांच्यामुळे काहींचा ब्लडप्रेशर वाढतो. काहींचा कमी होतो. योग्य मूल्यमापन करणारे आहेत. त्यामुळे पुढे औषधाच्या दुकानांमध्ये ‘देवेंद्र फडणवीस द्या’ असे बीपीचे पेशन्ट म्हणायला लागतील अशी मिश्किली त्यांनी केली.