Mumbai Rains Update : मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज

| Updated on: Jul 08, 2024 | 11:46 AM

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, रेल्वेरुळांवरही पाणी आल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली. मात्र मुंबई महापालिका ही नेहमीच सज्ज असते.

Follow us on

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, रेल्वेरुळांवरही पाणी आल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली. मात्र मुंबई महापालिका ही नेहमीच सज्ज असते. कालपासून झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर  कंट्रोल रूमकडून रात्रभर सर्व माहिती देण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणची माहिती कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांना पहायला मिळते. रात्रभर बीएमसीचे अधिकारी सर्व ठिकाणची पावसाची माहिती गोळा करण्याचे काम करत होते. ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे मदतीसाठी यंत्रणा पोहोचली की नाही याचे अपडेट्सही कर्मचारी घेत असतात. कुणे पाणी साचलं असेल, ट्राफिक जाम झाले असेल किंवा कुठे एखादी वेगळी घटना घडली आहे का याचे अपडेट्स कर्मचारी घेत असतात. या कंट्रोल रूमचं काम कसं चालतं ते पाहूया.