Mumbai | महानगरपालिका करणार नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन भाजप (BJP) नेत्यांवर जोरादर टीका केली होती.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन भाजप (BJP) नेत्यांवर जोरादर टीका केली होती. संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले होते. भाजपकडून नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यातील वादाचा पुढचा अंक पाहायला मिळणार आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थान “अधिश” या बंगल्याची पाहणी करण्याकरता आज मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येणार असल्याची माहिती आहे. त्या संदर्भातली नोटीस देखील नारायण राणे यांना पाठवलेली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली होती.
Published on: Feb 18, 2022 12:20 PM