मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली कोरोना लस, मुंबईत लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरण
किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली कोरोना लस, मुंबईत लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरण

| Updated on: Mar 04, 2021 | 12:47 PM

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची लस घेतली आहे. (Kishori Pedanekar take corona vaccine)

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची लस घेतली आहे. बीकेसी कोविड सेंटरमध्ये त्यांनीव्हॅक्सिन घेतली. व्हॅक्सिन घेतल्यावर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे महापौर 1 तास बीकेसी कोविड सेंटरमध्ये थांबणार असून.डॉक्टरांच्या परवानगीनंतरच महापौर तिथून बाहेर पडतील.

कोरोना लस घेतल्यानंतर एक कागद दिलाय, त्यानुसार आता मला काळजी घ्यावी लागणार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक वयोवृद्धाने मनाची तयारी करून यावं, असं आवाहन त्यांनी केले आहे. आता एक सिस्टम सुरू करतोय, ज्यामध्ये नोंदणी आमच्याकडे होईल. मोठ्या मनपा रुग्णालयात दोन सेंटर वेगळे करून लसीकरणाला सुरवात होणार असल्याची माहिती महापौर यांनी दिली.

मुंबईत झोपडी आणि इमारतीत राहणारा मुंबईकर हा सारखाच असून त्यांच्यापर्यंत कोरोना लस पोहोचवावी लागेल. विरोधकांनी लसीकरणाचं राजकारण करू नये, संभ्रम निर्माण करू नये, जी लस आलीये ते स्वीकारा, कारण त्याला तेवढ्याच मान्यता प्राप्त लोकांनी मान्यता दिली आहे. कोरोनाला काळाचं औषध आहे. शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढली नाही तर कोविड होतो, पण अशा घटना कमी आहेत. मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज वाटत नाही, मुंबईत कोरोनाचा कहर सध्या नाहीये, वरिष्ठ निर्णय घेतील, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

(BMC Mayor Kishori Pedanekar take corona vaccine at bkc covid center)

Published on: Mar 04, 2021 12:40 PM
Mumbai | मुंबईची हवा पुन्हा दूषित, एयर क्वालिटी इंडेक्स 212 वर; वायू प्रदुषणामुळे धुरकट वातावरण
Varsha Gaikwad | दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा सुरु, परीक्षा ऑफलाईन होणार: वर्षा गायकवाड