होय हे ईडीचंच सरकार! मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ‘ईडी’चं बोर्ड, नेमकं प्रकरण काय?
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 'ईडीचं' (ED) बोर्ड लागलं आहे. ईडीच्या बोर्डवरून पुन्हा एकदा ईडी सरकारचा विषय चर्चेत आला आहे.
मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ‘ईडीचं’ (ED) बोर्ड लागलं आहे. ई म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला आहे. यापूर्वी मंत्रालयात आकडेवारीनुसार बोर्ड लावले जात असत. परंतु यंदा मात्र नावाच्या अद्य अक्षरापासून बोर्ड लावण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर फडणवीस आणि शिंदे यांच्या अद्य अक्षराचा बोर्ड लावण्यात आला आहे. विरोधकांनी अधिवेशनादरम्यान शिंदे, फडणवीस सरकाराच उल्लेख ‘ईडी’ सरकार असा केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी होय हे ईडीचंच सरकार आहे असं म्हटलं होतं. ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याचं फडणवीस यांनी तेव्हा म्हटलं होतं.
Published on: Sep 16, 2022 10:43 AM