फोटो काढताना घाई करता, मग आता…; कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून सुजात आंबेडकर यांची भाजपवर टीका
मात्र ब्रजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन हे सुरू आहे. दरम्यान, आज रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ सुजात आंबेडकर यांनी कुस्तीपट्टूंची भेट घेतली
नवी दिल्ली : बृजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दरम्यान ब्रजभूषण सिंह यांनी आरोप फेटाळले आहेत. मात्र ब्रजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन हे सुरू आहे. दरम्यान, आज रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ सुजात आंबेडकर यांनी कुस्तीपट्टूंची भेट घेतली. तसेच आपला आणि आपल्या वंचित आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगितलं. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. आपल्या देशाचे प्रंतप्रधान असो किंवा त्यांचे मंत्री हे एखाद्या खेळाडूने पदक जिंकलं की त्यांच्याबरोबर फोटो काढायला लगेच घाई करतात. मात्र अशा परिस्थित येथे आंदोलन होत असताना, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ब्रजभूषण यांच्यावर कारवाईबाबत हे सरकार बोलायला तयार नाही. त्यामुळे आम्ही या सरकारचा धिक्कार करतो असे म्हणत सुजात आंबेडकर यांची भाजपवर टीका केली आहे.