Special Report | ‘Raj Thackeray यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही’ बृजभूषण यांची ठाकरेंना धमकी
बृजभूषण सिंह आपल्या व्यक्तव्यावर ठाम दिसत आहेत. मी योगीचा सल्ला घेत नाही असंही ते म्हणाले. मुंबई, चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्यापासून रोखण्याची धमकी देणाऱ्या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोध्यात येण्याआधी उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागावी असं भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरे यांना विरोध का करता असा सवाल केला. बृजभूषण सिंह आपल्या व्यक्तव्यावर ठाम दिसत आहेत. मी योगीचा सल्ला घेत नाही असंही ते म्हणाले. मुंबई, चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्यापासून रोखण्याची धमकी देणाऱ्या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे अयोध्येत प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. कोणीही व्यक्ती दर्शनासाठी कुठेही जाऊ शकते, हिंदी वाहिनीच्या नावाने नेहमीच राज ठाकरेंचे अर्धे अपूर्ण विधान दाखवले आहे, असे साळवी म्हणाले.
Published on: May 07, 2022 11:23 PM