गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दास यांनी त्यांच्या निवेदनात एक कोट सांगितला तो ऐकत होतो. मी त्यात थोडा बदल करतो. त्यांनी सांगितलं इतिहास हा एक प्रकारे महान व्यक्तींचं आत्मचरित्र असतं. पश्चिमेत तसा विचार असू शकतो. पण भारतात सामान्य माणसाची बायोग्राफी हाच इतिहास आहे. तेच देशाचं खरं सामर्थ्य आहे. मोठे लोक येतात निघून जातात. देश अजरामर असतो असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ : ग्लोबल समीट 2024 या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. India: Poised For The Next Big Leap हा चर्चासत्राचा विषय इंटरेस्टींग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ‘बिग लीप; तर आम्ही तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण जोश आणि ऊर्जेने भरलेलो असेल. कोणी हताश आणि निराश देश असो की व्यकीत बिग लीपचा विचार करू शकत नाही. ही थीमच सर्व सांगण्यासाठी पुरेशी आहे की, आजच्या भारताचा आत्मविश्वास किती उंचावर गेला आहे. आकांक्षा काय आहेत. आज जगाला वाटतंय भारत एक मोठी झेप घ्यायला तयार आहे. तर यामागे गेल्या दहा वर्षांचा पॉवर फुल लॉन्च पॅड असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दहा वर्षात असं काय बदललं. की आज आम्ही इथपर्यंत आलोय. हा बदल माइंडसेटचा आहे, हा बदल सेल्फ कॉन्फिडन्स आणि ट्र्स्टचा आहे. हा बदल गुड गव्हर्नेन्स सुशासनाचा आहे. दशकापर्यंत ज्यांनी सरकार बनवलं त्यांचा भारतीयतेच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. त्यांनी भारतीयांना अंडरइस्टिमेट केलं. त्यांनी त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखलं असे मोदी यांनी यावेळी सांगितले. तेव्हा लालकिल्ल्यावरून सांगितलं जायचं भारतीय निराशावादी आहेत. पराजय भावनेला स्वीकारणारे आहोत. लालकिल्ल्यावरून भारतीयांना आळशी संबोधलं गेलं. कामचुकार म्हटलं गेलं. जेव्हा देशाचं नेतृत्वच नैराश्याने भरलेलं असेल तर देशात आशेचा संचार कसा होईल ? देशातील लोकांनीही ठरवलं होतं, आता हा देश असाच चालेल. त्यात भ्रष्टाचार, घोटाळे, पॉलिसी पॅरालिसीस, घराणेशाही या सर्वांनी देशाची कंबर तोडली.परंतू गेल्या दहा वर्षात आम्ही या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढलं असल्याचे पंतप्रधान यांनी आपल्या भाषणात सांगितले..