Budget 2024 | ब्रीफकेस ते पेपरलेस, पाहा देशाच्या अर्थसंकल्पाचा अनोखा प्रवास

| Updated on: Jan 27, 2024 | 9:25 PM

Budget 2024 | केंद्र सरकार आपला अंतरिम अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करणार आहे. या सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. यानंतर लोकसभा निवडणूका होणार आहेत. हा अर्थसंकप्ल देखील डीजिटल रुपात म्हणजे पेपरलेस स्वरुपात सादर केला जाणार आहे. केव्हा पासून अर्थसंकल्प पेपरलेस झाला त्याची कहाणी मोठी रंजक आहे.

मुंबई | 27 जानेवारी 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यानंतर लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. निर्मला सीतारामन यांचा 2024 चा अर्थसंकल्प पेपरलेस असेल. याआधी अर्थसंकल्प हा ब्रीफकेस किंवा सुटकेसमधून आणला जायचा. बदलत्या काळानूसार पेपरलेस अर्थसंकल्प सुरु झाला. याची सुरुवात कधीपासून झाली? हे या पाहुयात. आर. के. शन्मुखम चेट्टी यांनी 26, नोव्हेंबर, 1947 मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. यावेळी त्यांनी ब्रिटीश परंपरेप्रमाणे अर्थसंकल्पासंबंधित सर्व कागदपत्र एका लेदरच्या बँगेतून संसदेत आणली होती. कालांतराने पुढच्या अनेक अर्थमंत्र्यांनी काही वर्ष हीच परंपरा सुरु ठेवली. निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प संसदेत आणण्याची परंपरा बदलली. 2019 मध्ये सीतारामन यांनी चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये बजेट दस्तऐवज घेऊन जाण्याची प्रदीर्घ परंपरा सोडली आणि ‘बही-खाता’ घेऊन गेले. त्यानंतर 2 वर्षातच म्हणजे कोरोना साथीपासून ( 2021 ) सलग तीन वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात सादर केला जातोय. अर्थमंत्र्यांनी डिजीटल टॅबलेटद्वारे संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवले. भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली.

Published on: Jan 27, 2024 08:25 PM
…तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही, काय म्हणाले एकनाथ खडसे
Budget 2024 | शेतकऱ्यांना मोठा लाभ, अर्थसंकल्पात मोदी सरकारचं मोठं गिफ्ट