Budget 2024 | 12 लाख पगार असेल तर भरू नका इन्कम टॅक्स, या फॉर्म्युल्याने वाचतील पैसे

| Updated on: Jan 29, 2024 | 1:15 PM

1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे, कारण लोकसभा 2024 च्या निवडणूका त्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे नवीन सरकार येईपर्यंत खर्च करता यावा म्हणून हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. तुमचे वेतन जर 12 लाख असेल तरी तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता. यासाठीचा फॉर्म्युला पाहा....

मुंबई | 29 जानेवारी 2024 : नवीन आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात होईल. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे बजेट सादर करतील. अर्थात नोकरदारांना आयकरात किती सवलत मिळते हे महत्वाचे असते. कारण उत्पन्नावर जेवढा कर वाचवता येईल, तितकीच चाकरमान्यांना बचत करता येते. तुम्हाला एचआर विभागाने एक मेल पाठवला असेल. त्यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी गुंतवणूकीसंबंधीचे पुरावे मागितले असतील. या एका ट्रिकमुळे तुम्हाला 12 लाखांच्या उत्पन्नावर एक रुपयाही कर भरण्याची गरज नाही.

असा वाचेल 12 लाखांच्या पगारवर कर

सॅलरी 12 लाख रुपये असेल तर तुम्हाला तुमच्या पगाराचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी HRA 3.60 लाख रुपये, LTA 10,000 रुपये आणि टेलिफोनचे बिल 6,000 रुपये असायला हवे. एकूण वेतनावर तुम्हाला डिडक्शनचा असा लाभ मिळेल

जर तुमचा पगार वार्षिक 12 लाख रुपये असेल तर या स्टेप्स फॉलो करुन तुम्हाला इनकम टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या एचआर विभागाची मदत घेऊ शकता.

आयकर विभागाच्या कलम 16 अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये

प्रोफेशनल टॅक्सपासून सवलत 2,500 रुपये

कलम 10 (13A) अंतर्गत HRA 3.60 लाख रुपये

कलम 10 (5) अंतर्गत LTA 10,000 रुपये

हा एकूण खर्च जोडल्यास कर सवलतीचा पगार 7 लाख 71 हजार 500 रुपये असेल

कलम 80C च्या अंतर्गत 1.50 लाख रुपये

कलम 80CCD च्या अंतर्गत टियर-1 अंतर्गत NPS वर 50,000 रुपये

80D अंतर्गत , पत्नी आणि मुलांसाठी आरोग्य विम्यापोटी 25,000 रुपये

पालकांच्या आरोग्य विम्यापोटी 50,000 रुपयांची सवलत

नाही द्यावा लागणार आयकर

सर्व डिडक्शन आणि सवलत जोडल्यास तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 4,96,500 असेल. त्यानंतर तुमची करपात्र कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. त्यावर करदात्याला कोणताही कर द्यावा लागत नाही. हाच तो फॉर्म्युला आहे. त्यामुळे तुम्हाला 12 लाख रुपयांची कमाई कर मुक्त करता येईल.

Published on: Jan 29, 2024 01:14 PM
असा रेडा कधी पाहीला नसेल, रोजचा खुराक ऐकाल तर चाटच पडाल
Budget 2024 | अर्थसंकल्पाचे नियोजन सरकार कसे करते ? कसा पैसा खर्च होतो