Budget 2024 | शेतकऱ्यांना मोठा लाभ, अर्थसंकल्पात मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

| Updated on: Jan 27, 2024 | 9:11 PM

Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचा फायदा होणारा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे.

मुंबई | 27 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना चांगले मोठे गिफ्ट देण्याची योजना मोदी सरकारने तयार केली आहे. मोदी सरकारने साल 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा निधी वाढविण्यात येणार आहे. दहा कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सरकार मदत करते. हा निधी आता सहा हजारावरुन आठ हजार प्रतिवर्ष करण्याची योजना आहे. फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता मिळाला होता. या योजनेत दर चार महिन्यांची सरकार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये वर्षाला देत असते. आता ही रक्कम आठ हजार रुपये होणार आहे.

Published on: Jan 27, 2024 09:09 PM
Budget 2024 | ब्रीफकेस ते पेपरलेस, पाहा देशाच्या अर्थसंकल्पाचा अनोखा प्रवास
Video | ‘मी आंदोलन केल्यानंतर…बॉलीवूडच्या अनेक लोकांना…’ काय म्हणाले राज ठाकरे