Kurla Building Collapse : कुर्लामध्ये इमारत कोसळली! 14 जणांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

| Updated on: Jun 28, 2022 | 9:27 AM

यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते.

मुंबई :  मुंबईत पुन्हा इमारत कोसळळ्याची घटना घडलीय. मुंबईतील (Mumbai Building Collapse) कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली. नेहरु नगर (Kurla Nehru Nagar) इथं असलेली ही एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला मलबा हटवून खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं. महानगरपालिकेनं इमारत खाली करण्याची नोटीस दिली होती.  तरीही त्याठिकाणी लोक राहत होते. दरम्यान, आता घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य (Kurla Building Collapse Rescue Operation) केलं जातंय.

Published on: Jun 28, 2022 09:27 AM
Special Report | फडणवीसांकडून बैठका, नेमका प्लॅन काय?
Ekanth Shinde : राजकीय घडामोडांना वेग! एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, राज्यपालांना पत्र देणार?