दुर्दैव! मेहनतं घेतली, पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळलं पण…; नंतर रस्त्यावर फेकावं लागलं; असं का झालं शेतकऱ्याबरोबर
अनेक ठिकाणी तर हातातोंडाला आलेलं पीक वाया गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच दाम मिळत नसल्याने अनेकांना टोमॅटो, कांदा रस्त्यावर फेकावा लागत आहे.
बुलढाणा : काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील शेतकरी हे अवकाली पाऊस, गारपीट, सोसाट्याचा वाऱ्यामुळे हैराण झाला आहे. अनेक ठिकाणी तर हातातोंडाला आलेलं पीक वाया गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच दाम मिळत नसल्याने अनेकांना टोमॅटो, कांदा रस्त्यावर फेकावा लागत आहे. अशीच स्थिती बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे. येथे खामगाव तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांचा कांदा अक्षरश जमिनीतच सडला आहे. मात्र काहींनी कांदा काढून सुद्धा त्याला उत्पादन खर्च निघेल एवढाही भाव नाही. त्यामुळे गारपीटीचा मार खाल्ल्याने तो कांदा टिकत नसल्याने चक्क रस्त्यावर कांदा फेकून द्यायची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आलीय. खामगाव तालुक्यात असलेल्या आंबेटाकली येथील शेतकरी संजय कोल्हे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकरात कांदा लागवड केली होती.. त्याला जवळपास 75 हजार एवढा खर्च आला आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीटीने कांदा पिकाने मार खाल्ला, त्यातून त्यांनी कसा – बसा दीड एकरात पाच टॉली कांदा काढला. मात्र तो गारपीटीने मार खाल्लेला कांदा टिकणार कसा आणि विकावा तर उत्पादन खर्चही निघणार नाही एवढा भाव आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आपल्या शेतातील कांदा चक्क रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.