Bullock cart race : बैलगाडी शर्यतीचा सर्वोच्च निकाल!, राष्ट्रवादीच्या नेत्याने अमोल कोल्हे याचंच का केलं कौतूक?
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत तर तामिळनाडू जलीकट्टू या खेळांवर असणारी बंदी आज न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर परवानगी दिली आहे.
मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर आधी बैलगाडी-घोडागाडी शर्यती होत होत्या. यामधून घोडा-बैलांवरील अत्याचार होत होते. याकारणाने प्राणीमित्रांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेली सात वर्ष सुनावणी सुरू होती. या 12 वर्षानंतर आता याचा निकाल आला आणि राज्यासह तामिळनाडूमध्ये देखील जल्लोष केला जात आहे. महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत तर तामिळनाडू जलीकट्टू या खेळांवर असणारी बंदी आज न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी यांनी पेढे वाटून जल्लोष केला. तसेच आज आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर यावरून याच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून श्रेय्यवाद होतच राहील. पण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय तो शेतकऱ्यांसाठी दिलाय या निर्णयाचे मी स्वागत करते. हा श्रेय वादाचा विषय नाही हा सामाजिक विषय आहे कोल्हे यांनी यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. यासाठी मी त्यांचा आभार मानते असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.