आता माळ राणात नाही तर येथे भरणार बैलगाडा शर्यती; खासदार अमोल कोल्हे यांची काय आहे मागणी?

| Updated on: May 21, 2023 | 7:49 AM

याचदरम्यान बैलगाडा शर्यतींसाठी आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनविण्यात यावे अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केली आहे.

जुन्नर : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतींसाठी आता अनेक मैदानं आणि बैलगाडा चालक मालक तयार झाले आहेत. याचदरम्यान बैलगाडा शर्यतींसाठी आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनविण्यात यावे अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केली आहे. यामधे मीडिया गॅलरी, प्रेक्षकांना बसण्याची सुविधा, बैलाच्या सुरक्षेतते साठी पशू वैद्यकीय सुविधा, बैलासाठी निवारा आणि पाण्याची सोय असणार आहे. यामुळे बैलांची सुरक्षितता आणि न्यायालयाने नियमावलीचे पालन करून बैलगाडा शर्यत ही फक्त नाद न राहता एक परंपरा म्हणून जगासमोर जाईल असेही ते म्हणालेत. तर स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी आणि देशी गोवंशाचे रक्षण होण्यासाठी एक मॉडेल बैलगाडा स्टेडियम बनविण्याची संकल्पना असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

Published on: May 21, 2023 07:49 AM
महाराष्ट्राचा बिहार होतोय? ‘एकदा कार्यक्रमाला येऊन तर बघा…’ गौतमी पाटील स्पष्टचं बोलली…
अजित पवार याचं कोल्हापूरकरांना थेट आवाहन, तर घेतली सतेज पाटील यांची फिरकी; म्हणाले, बंटी म्हणू नका…