अनिल देशमुखांवरील खटला चालविण्यास सीबीआयला संमती
अनिल देशमुखांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई काय केली जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. ज्या सीबीआयकडून दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते, त्याच सीबीआयला आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत खटला चालविण्यास समती देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावरील कारवाईना आता वेग आल्यामुळे विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडचणीत येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई काय केली जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.