Sudhir Mungantiwar : 15 ऑगस्टपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार, जनतेची काम रखडलेली नाहीत

| Updated on: Aug 07, 2022 | 9:34 PM

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी जनतेची कामे खोळंबलेली नाहीत. विरोधकांकडून केवळ बाऊ केला जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुढे करुन बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मात्र, लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लावला जाणार आहे. शिवाय आमदारांनी पक्ष सोडून असा उठाव करणे म्हणजे पक्षाचे अपयश असल्याचे मुनगंटीवार सांगितले आहे.

दिल्ली : आ. सुधीर मुनगंटीवारसह इतर भाजपाचे आमदार हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुशंगाने दिल्लीत दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी नाही तर पक्ष संघटनेच्या अनुशंगाने आयोजित असलेल्या बैठकीसाठी दिल्लीत आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तर 15 ऑगस्टपूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होणार आहे. मंत्रिमंडळ स्थापनेला कसलीच अडचण नाही. शिवाय कुणामध्येही मतभेद नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी जनतेची कामे खोळंबलेली नाहीत. विरोधकांकडून केवळ बाऊ केला जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुढे करुन बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मात्र, लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लावला जाणार आहे. शिवाय आमदारांनी पक्ष सोडून असा उठाव करणे म्हणजे पक्षाचे अपयश असल्याचे मुनगंटीवार सांगितले आहे.

Thane Rakhi | केळीच्या झाडाच्या खोडापासून तिरंगी राख्या
Special Report | कोर्टातल्या सुनावणीमुळं मंत्रिमंडळ विस्तार लांबला?