Special Report | मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त ठरला
महाविकास आघाडीतील दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे आणि संजय शिससाठ यांचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही तासावर आलेला मंत्रिमंडळाचा शपथविधी कसा आणि कोणाकोणाला घेऊन होणार याकडे आमदारांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी होऊन 38 झाल्यानंतर राज्याला आता नवं मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्री उद्या शपथ घेत आहेत, त्यामध्ये भाजपचे 9 आमदार असल्याचेही सांगण्यात येत आहे. उद्या शपथविधी होत असला तरी 9 आमदार मंत्री होणार असून भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन कॉंग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गृह आणि अर्थ खाते भाजपकडेच ठेवण्यात येणार असून त्यानंतची सगळे खातेवाटप केले जाणार आहे. तर महाविकास आघाडीतील दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे आणि संजय शिससाठ यांचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही तासावर आलेला मंत्रिमंडळाचा शपथविधी कसा आणि कोणाकोणाला घेऊन होणार याकडे आमदारांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.