Special Report | मंत्रिमंडळ विस्तारासाठी ‘तारीख पे तारीख’

| Updated on: Jul 26, 2022 | 11:37 PM

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीत असतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी आम्ही मुंबईत परतल्यावर मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा संबंध नाही असं शिंदे आणि भाजप नेते सांगतायत. पण अजूनही विस्तार का झालेला नाही याचं कारण कुणीही सांगत नाही

 मुंबई :  शिंदे आणि फडणवीसांनी शपथ घेऊन आज 26 दिवस झाले आहेत. तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारखांवर तारखा दिल्या जातात आहेत(Cabinet expansion postponed). याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीत असतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी आम्ही मुंबईत परतल्यावर मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा संबंध नाही असं शिंदे आणि भाजप नेते सांगतायत. पण अजूनही विस्तार का झालेला नाही याचं कारण कुणीही सांगत नाहीए. सुप्रीम कोर्टात आता 1 ऑगस्टला सुनावणी आहे. त्य़ामुळं मंत्रिमंडळ विस्तार सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच होण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 26, 2022 11:37 PM
Vaibhav Naik : राणेंनी किती सुपाऱ्या दिल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत, वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला
Special Report | आगामी निवडणुकीत धनुष्यबाणाचं चिन्ह गोठणार?