अंधारेंना ही माहिती कुठल्या सूत्रांकडून मिळते? सामंत यांचा खोचक सवाल

| Updated on: Mar 31, 2023 | 12:30 PM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सावंत यांच्यावर टीका केली होती. तसेच सावंत यांना मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार होतो, असं सांगायचं असेल अशी केली होती

ठाणे : कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये आपण मविआचे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षांत 100 ते 150 बैठका घेतल्याचे सांगितलं होतं. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. तसेच सावंत यांना मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार होतो, असं सांगायचं असेल अशी केली होती. त्यावर उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. त्यांच्या मनातही हा विषय येणार नाही. मात्र अंधारे यांना ही माहिती कुठल्या सूत्रांकडून मिळते हे आपल्याला माहित नसल्याचेही ते म्हणाले. काही लोकांना असं वाटत असतं अश्या पद्धतीने बोलल्यानंतर कुठेतरी वाद लागेल. राजकारणाची ही जुनी स्टाईल झाली. आता त्याच्यावरती दुर्लक्ष करायचं असतं

Published on: Mar 31, 2023 12:30 PM
नाले साफसफाईच्या कामांवर आता ड्रोन ठेवणार नजर, कामात कुचराई आढळल्यास कारवाई
किराडपुराचे जीवन पूर्वपदावर मात्र संभाजीनगरमधील राड्यात एकाचा मृत्यू, 14 पोलीस जखमी