मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का, कोरोना काळातील कामांची होणार कॅग मार्फत चौकशी
कोरोना काळामध्ये मुंबईत रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तेव्हा तातडीने उपचार करण्यासाठी, सोईसुविधा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवताच कोविड सेंटर्स उभारणे आणि औषधे व इतर सामुग्रीच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले होते.
मुंबई : राज्यातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे एकमेंकाच्या समोर आले आहेत. त्यांच्या टीका होताना दिसते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे गटाला खिंडीत अडवण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पेचात अडकवण्यासाठी मुंबई महापालिकेवर आपलं लक्ष केंद्रीत करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना अडकविणासाठी मोर्चे बांधनी केली आहे. तसेच महापालिकेच्या मागील २ वर्षांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी होईल, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला अडचणांचा सामाना करावा लागण्याची शक्यता आहे.
कोरोना काळामध्ये मुंबईत रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तेव्हा तातडीने उपचार करण्यासाठी, सोईसुविधा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवताच कोविड सेंटर्स उभारणे आणि औषधे व इतर सामुग्रीच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले होते. या प्रक्रियेत अधिकारांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने केला होता.
या आरोपांची चौकशी करण्यासाठीच कोरोना काळातील कामांसह इतर कामांची चौकशी कॅग करणार आहे. याबाबात शिंदे सरकारने भारताचे नियंत्रक व महालेखापाल अर्थात कॅगला विनंती केली होती.