कैदेत असलेला एक अधिकारी मिडीयाला कसा बाईट देऊ शकतो ? अतुल लोंढे यांचा सवाल

| Updated on: Aug 03, 2024 | 6:30 PM

अनिल देशमुख कैदेत असताना त्यांना कधी मिडीयाशी बोलू दिले होते का? आता सचिन वाझेला मिडीयाशी कसे बोलू दिले जात आहे.या पोलिसांवर कारवाई होणार का ? असाही सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांना हाताशी धरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बदनाम करुन आघाडी सरकार कोसळविण्याचा प्रयत्न केला. आता देखील अनिल देशमुख यांना ईडीची भीती घालून ठाकरे यांना कसे तुरुंगात डांबण्यासाठी फाईलवर कशा सह्या करुन घेण्याचा फडणवीस यांचा कसा डाव होता हे उघड झाल्याने भाजपा त्रस्त झाली आहे. त्यामुळे भाजपाने कैदेतील आरोपी पोलिस अधिकाऱ्याला ( सचिन वाझे ) मिडीयाशी बोलू दिले आहे. कैद्येत असताना अनिल देशमुख यांना कधी बोलू दिले का ? हेमंत सोरेन यांना कैद्येत असताना मिडियाशी बोलू दिले का ? अरविंद केजरीवाल यांना मिडीयाशी बोलू दिले जात आहे का ? असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे. आता सचिन वाझे याला मिडीयाशी बोलू देणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का ? असाही सवास कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

Published on: Aug 03, 2024 06:29 PM
मनोज जरांगे मविआच्या काळात जन्मला नव्हता का? भाजपा नेत्याचा तिखट सवाल
वय कितीही असलं तरी दिसलं नाही पाहिजे, प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य